रोप लागवडीसाठी शेतकऱयांना वीजपुरवठय़ाची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुक्मयात रोप लागवडीला सुरुवात झाली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे रोप लागवडीला पाण्याची गरज असून सध्या विद्युत मोटारांद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. याकरिता थ्रीफेज विद्युतपुरवठा नियमित व सुरळीत सुरू ठेवावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. परंतु त्यानंतर मात्र मागील 15 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आता रोप लागवडीसाठी पाण्याची आवश्यकता भासत आहे. बेळगाव शहरासह तालुक्मयात रोप लागवडीला सुरुवात झाली असून, थ्रीफेज विद्युत पुरवठा गरजेचा आहे. परंतु तालुक्मयाच्या काही भागात अनियमित थ्रीफेज विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱयांना याचा फटका बसत आहे.
झाडशहापूर परिसरात सकाळी 5 तर सायंकाळी 2 तास वीजपुरवठा
तालुक्मयात सर्वाधिक कृषी पंपांची संख्या उचगाव, कडोली, होनगा या परिसरात आहे. या भागात सध्या सात तास थ्रीफेज विद्युत पुरवठा दिला जात आहे. झाडशहापूर परिसराला औद्योगिक वसाहतीतूनच वीजपुरवठा केला जात असल्याने दिवसभर वीजपुरवठा देणे शक्मय नसते. त्यामुळे सकाळी 5 तास तर सायंकाळी 2 तास वीजपुरवठा केला जात असल्याचे हेस्कॉमकडून सांगण्यात आले.
दिवसा 7 तास थ्रीफेज विद्युत पुरवठा
सध्या तालुक्मयात दिवसा 7 तास थ्रीफेज विद्युत पुरवठा केला जात आहे. 15 दिवसांनी या वेळापत्रकात बदल केला जातो. पहाटे 5 ते दुपारी 12 व दुपारी 12 ते सायंकाळी 7 अशा दोन टप्प्यांमध्ये त्या-त्या परिसरात वीजपुरवठा केला जात असल्याची माहिती विवेक नाईक यांनी दिली.
– विवेक नाईक (साहाय्यक कार्यकारी अभियंते)









