जाफरवाडी, कणबर्गी, हिंडलगा, आंबेवाडी, सांबरा येथे पहिलाच प्रयोग, शेतकऱयांत कुतुहल
प्रतिनिधी /बेळगाव
तांदूळ म्हटलं की, पहिला आठवतो तो भात, भाताचे अनेक प्रकार आपण पाहतो, त्याचा स्वादही घेतो. तालुक्मयाच्या ग्रामीण भागात असे अनेक प्रकारचे तांदूळ उत्पादीत केले जातात. यंदा काही शेतकऱयांनी प्रायोगिक तत्वावर ब्लॅक राईस (काळा तांदूळ) उत्पादनाला प्रारंभ केला आहे. काळय़ा आईच्या पोटातून आता काळय़ा लोंबांनी शिवार बहरले आहे. तालुक्मयात हा पाहिलाच प्रयोग असल्याने शेतकऱयांत कुतूहलाचा विषय ठरत आहे.
तालुक्मयातील काही शेतकऱयांनी पारंपरिक भात शेतीबरोबर अधिक उत्पादन आणि औषधी गुणधर्म असणाऱया काळय़ा भाताची लागवड केली आहे. उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून यंदा काही शेतकऱयांनी खरीप हंगामात हा नवीन प्रयोग केला आहे. तालुक्मयातील काही मोजक्मया शेतकऱयांनी चक्क काळय़ा भाताचे उत्पादन घेतले आहे. तालुक्मयातील जाफरवाडी, कणबर्गी, हिंडलगा, आंबेवाडी आणि सांबरा याठिकाणी काळय़ा भाताची लागवड केली असून काळय़ा लोंबांनी भात बहरले आहे.
तालुक्मयातील ग्रामीण भागात पारंपारिक दोडगा, बासमती यासह इंद्रायणी, सोनम, शुभांगी, आमन या भातपिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा प्रथमच काळा तांदूळ (ब्लॅक राईसचे) उत्पादन घेण्यात आले आहे. भात पोसवून काळी लोंबे बाहेर पडली आहेत. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या लोंबातील तांदूळही काळाच आहे. मात्र अधूनमधून ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे या भाताची कापणी लांबणीवर पडली आहे. येत्या काही दिवसांत या काळय़ा जातीच्या भाताची कापणी होवून मळणी होणार आहे. त्यामुळे आता लवकरच शेकऱयांच्या घरात आणि स्थानिक बाजारपेठेत ब्लॅक राईस (काळा तांदूळ) दिसणार आहे.
भात येण्यास 110 दिवसांचा कालवधी
साधारण 110 दिवसांचे हे भातपीक जोमात आले असले तरी अवकाळी पावसामुळे यालाही काहीप्रमाणात फटका बसला आहे. हिरव्यागार शिवारात हे काळे भात शेतकऱयांसाठी आकर्षक ठरत आहे. आरोग्यासाठी देखील हे भात उत्तम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे याला बाजारात देखील अधिक मागणी असून प्रति किलो 250 रुपयांपर्यंत विक्री होते असेही शेतकरी सांगत आहेत. याबरोबच सदर बियाणे 600 रु प्रति किलो दराने खरेदी केल्याचे शेतकऱयांनी सांगितले. तामिळनाडू येथून बियाणे मागविले असल्याचे सांगितले.
विशेषतः पाणथळ शिवारात लागवड
काळय़ा भाताची लागवड ही विशेष करून पाणथळ शिवारात केली जाते. या भाताच्या बियाणांची किंमत देखील अधिक असते. यंदा तालुक्मयात प्रथमच लागवड केली असली तरी पुढील काळात काळय़ा भाताच्या लागवडीत वाढ होणार आहे. या भाताचे उत्पादन ही अधिक आहे. याबरोबर आरोग्यासाठी देखील हा तांदूळ फायदेशीर आहे.
– आर. बी. नायकर (तालुका सहाय्यक कृषी अधिकारी)
काळय़ा तांदळाच्या चवीचे औत्सुक्य

यंदा हा काळय़ा भात लागवडीचा पहिलाच प्रयोग आहे. मात्र भात चांगल्याप्रकारे भरले असून काळी लोंबे देखील बाहेर पडली आहेत. त्यामुळे यंदा घरात देखील काळय़ा तांदळाची चव चाखता येणार आहे. काळा तांदूळ कसा असतोय? याचे कुतूहल होते. त्यामुळे यंदा लागवडच केली आहे. अवकाळी पावसाचा फटका बसला असला तरी काळय़ा भाताचे बऱयापैकी उत्पादन होईल.
– सुगंधा पिराजी पाटील (जाफरवाडी, महिला शेतकरी)









