वार्ताहर / बालेकुंद्री
इंडी (जिल्हा विजापूर) तालुक्यातील कर्नाटक विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष बसवराज सावकार एस. कमतगी यांनी बेळगाव तालुक्यातील माध्यमिक शाळांचे शिक्षक, कर्मचाऱयांना एन 95 मास्कचे वितरण केले.
तालुक्याचे बीईओ रूद्रगौड जुट्टनावर, संघाच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते बेळगाव तालुक्यातील शिक्षकांना मास्कचे वितरण करण्याचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला.
यावेळी बोलताना बीईओ रूद्रगौड जुट्टनावर म्हणाले की, कर्नाटक विद्यावर्धक संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी कर्नाटक विद्यावर्धक संघाच्या पदाधिकाऱयांनी 679 शिक्षकांसह कर्मचाऱयांना मास्कचे वाटप
केले.









