वार्ताहर/ किणये
तालुक्मयात शनिवारी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. खरीप हंगामातील पिकांना हा पाऊस उपयोगी ठरणार आहे. भातरोप लागवडीसाठी दमदार पावसाची गरज आहे, अशी माहिती शेतकऱयांनी दिली आहे.
भातरोप लागवड करण्यासाठी रोपे सज्ज झाली आहेत. रोप लागवडीकरिता शिवारात चिखल करणे गरजेचे आहे. चिखल मशागत करण्याकरिता शिवारात पाणी साचून राहण्याची आवश्यकता आहे. शनिवारी पाऊस झाला असून अजूनही दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यास रोप लागवडीस सोयीस्कर होणार आहे.
आर्द्रा नक्षत्राला दि. 21 जूनपासून प्रारंभ झाला आहे. आर्द्राची सुरुवात कोरडीच झाली. आर्द्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात पाऊस झाला असल्याने बळिराजाला दिलासा मिळाला आहे. दि. 5 पासून पुनर्वसु नक्षत्राला प्रारंभ होणार आहे.
सध्या शिवारात पेरणी करण्यात आलेले भातपीक बऱयापैकी बहरून आले आहे. यामध्ये शेतकऱयांनी दोन ते तीन वेळा कोळपणी केली आहे. भुईमूग पेरणी पूर्णत्वास आली आहे.
बटाटा लागवड अंतिम टप्प्यात आहे. बटाटा बियाणे कुजल्याने शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. पश्चिम भागात दरवषीच्या तुलनेत यंदा बटाटा लागवड कमी प्रमाणात करण्यात आली आहे.
गेल्या दहा-बारा दिवसात पावसाने उघडीप दिली होती. यामुळे रताळी वेल लागवडीची कामे खोळंबली होती. आता पाऊस पुन्हा सुरू झाला असल्याने रताळी वेल लागवडीच्या उर्वरित कामांना जोर येणार आहे.
शुक्रवारी सायंकाळीही तालुक्मयाच्या काही भागात पाऊस झाला. शनिवारी पहाटेपासून मात्र तालुक्मयाच्या सर्रास भागात पाऊस झाला. असाच पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकऱयांनी व्यक्त केली आहे..









