वार्ताहर / किणये
तालुक्मयात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दि. 22 रोजी होणाऱया ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. दि 11 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने तालुक्मयातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये अर्ज भरण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या. तर शनिवार दि. 12 रोजी अर्जांची छाननी करण्यात येत होती. यावेळीही अर्ज दाखल केलेले उमेदवार ग्रामपंचायती समोर ठाण मांडून बसलेले पहावयास मिळाले.
दिनांक 14 रोजी अर्ज माघार घेण्यात येणार असून आपले समर्थन वाढविण्यासाठी व निवडणूक जिंकण्यासाठी अनेकजण काही जणांना अर्ज माघार घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही चित्र अनेक गावागावांमध्ये पाहावयास मिळत आहे.
तालुक्मयात यंदाची ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. गावागावांमध्ये शिवारामध्ये छुप्या पद्धतीने ओल्या पाटर्य़ाही रंगू लागलेल्या आहेत. निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समिती, बीजेपी, काँग्रेस, ग्रामविकास आघाडी व अपक्ष यातून उमेदवारानी आपले अर्ज दाखल केले आहेत. तर बहुतांशी गावांमध्ये ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येत आहे. तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, लोकसभा व विधानसभा यावेळीच्या निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत निवडणूक लढविण्यावर भर देण्यात येतो मात्र गाव पातळीवर राजकारण असल्यामुळे अनेक गावांमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढविण्यात येत आहे तसेच ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून काही जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अलीकडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास योजना राबविल्या जाऊ लागले आहेत. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला अधिक महत्त्व आलेले आहे. गावातील कोपऱयांवर, चौकांमध्ये व मंदिरांमध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे की आपल्या गावातून कोणी कोणी अर्ज दाखल केला आणि कोण माघार घेणार अशी एकच चर्चा सर्वत्र रंगलेली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे आरक्षण झाल्यापासूनच अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गावातील प्रमुख पंच मंडळी, तरुण कार्यकर्ते, विविध संघटना, संस्था, महिला मंडळ, आदींनी गाठीभेटी उमेदवार घेऊ लागले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता येण्यासाठी काहीजणांनी पॅनेलद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आपले पॅनल मजबूत करण्यासाठी काही उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांना अर्ज माघार घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न ही चालू झालेले आहेत. सोमवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियानंतरच कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये किती उमेदवार रिंगणात राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
संतीबस्तवाड ग्रामपंचायतीमध्ये 15 जागांसाठी 40 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत या अर्जांची छाननी शनिवारी करण्यात येत होती.
किणये ग्रामपंचायतीची निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे. आतापर्यंत म. ए. समितीचे वर्चस्व या ग्रामपंचायतीवर होते. सध्या होणाऱया निवडणुकीत म. ए.समिती, भाजप, काँग्रेस व ग्राम विकास आघाडी यातून ही निवडणूक रंगतदार होणार आहे. किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, नावगे, बामणवाडी जानेवाडी, कर्ले या गावांचा किणये ग्रामपंचायतीमध्ये समावेश आहे. 22 जागांसाठी 72 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत या अर्जाची शनिवारी छाननी करण्यात येत होती.









