अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची दाट शक्मयता : बागांची साफसफाई आणि काजू जमा करण्यात शेतकरी व्यस्त : कृषी खात्यामार्फत मार्गदर्शनाची गरज
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
तालुक्मयात काजूच्या हंगामाला जोमाने सुरुवात झाली आहे. काजू उत्पादक शेतकरी बागांची साफसफाई करून राखण करण्याच्या कामात सध्या व्यस्त आहेत. ढगाळ वातावरण व वळीव पावसामुळे काजूच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱयांतून वर्तविली जात आहे. शेतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये फळबाग शेती हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा घटक आहे. फळ बागायतदार शेतकऱयांना काळानुरुप अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गेल्या दहा-बारा दिवसात वातावरणात कमालीचा बदल झाला असल्यामुळे काजू मोहोरावर त्याचा विपरीत परिणाम झाला असल्यामुळे शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले
आहे.
अडीच ते तीन महिने या काजूचा हंगाम जोमाने सुरू असतो. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत बेळगाव जिह्यात काजू उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. यंदा फेब्रुवारीच्या मध्यानंतर झाडांना फळधारणा होऊ लागली तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून मोहोर येण्यास प्रारंभ झाला होता. एप्रिल, मे या दोन महिन्यात काजूचे उत्पादन सर्वाधिक मिळते. त्यामुळेच सध्या तालुक्मयाच्या विविध ठिकाणी असलेल्या काजू बागायतीमध्ये काजू बागांची राखण करणे, काजू जमा करताना शेतकरी दिसत आहेत.
काजू मुरटय़ाच्या मागणीत वाढ
बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्मयातील बहुतांशी भागात काजूचे उत्पादन घेण्यात येते. काजूच्या उत्पन्नावर शेतकऱयांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. काजू गोळा करून त्याची विक्री करण्यात येते.
तसेच काजूच्या मुरटय़ाला मागणी वाढत असल्यामुळे स्थानिक टेम्पो मालक थेट काजू बागायतीमधून मुरटय़ाची उचल करतात. काजूच्या झाडांसाठी सुरुवातीची तीन वर्षे त्याची देखभाल करावी लागते. त्यानंतर मात्र निसर्ग नियमाप्रमाणे काजू झाडांची वाढ होत जाते. यामुळे काजू बागायतीसाठी अल्प प्रमाणात खर्च येतो. त्यामुळे शेतकऱयांना काजू बाग आर्थिक दृष्टय़ा फायदेशीर ठरते आहे.
मागील वषी हवामानातील बदल व धुक्मयामुळे काजू उत्पादनात घट झाली होती तसेच काजूला प्रति क्विंटल 8500 ते 9500 रु. असा दर मिळाला होता. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले
होते.
उत्पादनावर परिणाम होण्याची शक्मयता
यंदा तरी निसर्ग बऱयापैकी साथ देईल, अशी आशा शेतकरी वर्गाला होती. कारण जानेवारी महिन्याच्या मध्यानंतर काजू झाडांना बऱयापैकी मोहोर येऊन झाडे बहरुन आली होती. मात्र सध्या हवामानातील बदल व पावसामुळे काजू उत्पादनावर परिणाम होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. यावषीचा हंगाम साधण्यासाठी बागांमध्ये स्वच्छतेचे काम गेल्या पंधरा-वीस दिवसापासूनच सुरू करण्यात आले
होते.
बेळगाव तालुक्मयातील किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, नावगे, बिजगर्णी, बेळवट्टी, कावळेवडी, बेळगुंदी, बोकमूर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, इनाम बडस, आंबेवाडी, उचगाव, बाची, कुदेमनी, वाघवडे, संतिबस्तवाड, बामणवाडी, बाळगमट्टी, झाडशहापूर आदींसह खानापूर तालुक्मयामध्ये काजू पीक घेण्यात येते. तालुक्मयाच्या पश्चिम भागात व चंदगड तालुक्मयामध्ये सर्वाधिक काजू उत्पादन घेण्यात येते.
तीन वर्षानंतर फळधारणा
शेतातील बांधावर काजू रोपटे लावून बागायती तयार करण्यात येत आहेत. काजू रोप लागवडीनंतर प्रारंभी त्याला खतपाणी देऊन त्याची देखरेख करण्यात येते. माळरानावरील काजूच्या झाडांना जनावरे व इतर प्राणी खाऊ नयेत म्हणून झाडांवर शेणाचे शिंतोडे मारण्यात येतात. लागवडीच्या तीन वर्षानंतर काजू झाडाला फळधारणेला सुरुवात होते. पश्चिम भागातील शेतकरी बहुतांशी प्रमाणात या काजूच्या उत्पादनातून मिळणाऱया उत्पन्नावर अवलंबून असतात.
वर्षभरासाठी लागणारी खते, बी-बियाणे, मुलांचा शैक्षणिक खर्च, लग्नकार्य, यात्रा, आदी बाबी या काजूच्या उत्पन्नावर अवलंबून असतात,
मजुरांची टंचाई
सध्या बागायतींची साफसफाई व काजू जमा करण्याचे काम जोमाने सुरू आहे. पश्चिम भागात सर्रास शेतकऱयांच्या बागायती असल्यामुळे काजू जमा करण्यासाठी मजुरांची टंचाई भासत आहे, बागायती स्वच्छ करण्यासाठी व काजू जमा करण्यासाठी येणाऱया मजुरांना 160 ते 180 रुपये प्रत्येकी दर दिवसाला मजुरी देण्यात येत आहे. मजुरीची रक्कम भागानुसार ठरविण्यात
येते.
गोव्यातून मुरटय़ाला मागणी
काजूच्या मुरटय़ाला गोव्यातून चांगली मागणी होऊ लागली आहे. यामुळे स्थानिक टेम्पो मालक काजूच्या हंगामात दोन महिने पश्चिम भागातील काजू मुरटे गोव्याला घेऊन जात
असतात.
गेल्यावषी कोरोनामुळे मुरटय़ाची उचल झाली नाही. त्यामुळे काजू बागेमध्येच मुरटे पडून कुजून गेले. याचा फटकाही शेतकऱयांना बसला होता. सध्या बागायतीमधून मुरटय़ाची उचल होत असून एका मध्यम मुरटय़ाच्या डब्याला 10 रुपये असा दर देण्यात येत आहे. सध्या पश्चिम भागातील सुमारे 20 ते 25 टेम्पोची वाहतूक गोव्याला होत आहे.
प्रक्रिया करणाऱया युनिट निर्मितीवर भर द्यावा

पश्चिम भागातील काजूला मागणी अधिक आहे काजूच्या गराला प्रतिकिलो 600 ते 900 रुपये असा दर आहे. या तुलनेत शेतकऱयांकडून काजूची अगदीच कमी दरामध्ये उचल केली जाते. याचा फटका उत्पादक शेतकऱयांना बसतो आहे. त्यामुळे काजूवर प्रक्रिया करणारे युनिट तयार झाले पाहिजे.
-संतोष नलवडे, बेळवट्टी
माळरानावरील बागायती निसर्गावर अवलंबून

माळरानावरील बांधावर काजूची बाग केली आहे. काजू उत्पादनात वाढ होऊ लागली आहे. मात्र या बागायती पूर्णपणे हवामान व निसर्गावर अवलंबून असल्यामुळे उत्पादनाची शाश्वती नसते. गेल्या दहा-बारा दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. तसेच वळीव पाऊस व धोक्मयामुळे मोहोर गळून पडला आहे.
-कल्लाप्पा पाटील, बाळगमट्टी
काजू झाडांबद्दल मार्गदर्शनाची गरज

तालुक्मयात शेतीला जोड उद्योग म्हणून काजूच्या बागायती मोठय़ा प्रमाणात करण्यात आल्या आहेत. हवामानात होणाऱया बदलामुळे काजू उत्पादनात घट होत आहे. उत्पादकांना सहकार्य होण्यासाठी फलोद्यान खात्यातर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत मोहोर व काजू झाडांबद्दल मार्गदर्शन होण्याची गरज आहे.
-विनायक पाटील ग्रा. पं. सदस्य, कर्ले
गेल्या 9 वर्षांतील काजूला मिळालेला दर
| साल | प्रति किलो दर |
| 2020 | 85 ते 95 |
| 2019 | 115 ते 120 |
| 2018 | 160 ते 165 |
| 2017 | 150 ते 155 |
| 2016 | 142 ते 146 |
| 2015 | 99 ते 101 |
| 2014 | 90 ते 92 |
| 2013 | 54 ते 55 |
| 2012 | 80 ते 88 |









