वार्ताहर/ उचगाव
बेळगाव तालुक्यातील खेळाडू हे नेहमीच क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल ठरले आहेत. अनेक शाळांचे खेळाडू राज्य-राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकत असल्याचे दिसून येते. हे सातत्य कायम टिकवून ठेवण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी बदलत जाणाऱया नियमांचा अभ्यास करून खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्नशील रहा, कोरोना संपला नाही, सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन बेळगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर. पी. ज्युटनावर यांनी केले. बेळगाव तालुक्यातील सर्व शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शारीरिक शिक्षण विषयांच्या शिक्षकांची कार्यशाळा डिव्हाईन मर्सी स्कूल मच्छे येथे पार पडली. यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना ज्युटनावर बोलत होते.
आर. पी. ज्युटनावर यांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेळगाव तालुक्याचे शारीरिक शिक्षणाधिकारी एस. बी. हंचनाळ, कर्नाटक राज्य शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष सी. एस. बरगाली, बेळगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. के. शेळके, प्राथमिक विभागाचे शारीरिक शिक्षक संघटनेचे फाल्गून, मास्तोळे, गुळय़ापनवर, अक्की, व्यासपीठावर उपस्थित होते. या वर्षातील बेळगाव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक क्रीडा शिक्षकांसाठी ही पहिलीच कार्यशाळा होती. या कार्यशाळेमध्ये फिट इंडिया, खेलो इंडिया, एफ ए वन, टू, थ्री, फोर, एस ए वन या संदर्भात शिक्षकांना माहिती देण्यात आली. या कार्यशाळेमध्ये बेळगाव तालुक्यातील 8 झोनचे प्रमुख एन. ओ. चौगुले, वाय. सी. गोरल, एन. एफ. चक्रसाली, एन. आर. पाटील, रणजित कणबरकर, कुंभार यासह तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक उपस्थित होते. वर्षभरातील अभ्यासक्रम, प्रत्येक महिन्याला कोणता अभ्यासक्रम कशाप्रकारे घ्यावा, यासंदर्भात मास्तोळे व फाल्गून यांनी सविस्तर माहिती दिली. एस. बी. हंचनाळ यांनी आभार









