बेळगाव
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दि. 11 जानेवारी रोजी ठीक 3.30 वाजता जत्तीमठ बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे.
बैठकीमध्ये 17 जानेवारी हुतात्मा दिनाचे आचरण करण्याबाबत आणि कार्यकर्त्यांच्या सूचना आणि विचाराने हुतात्मा दिनाचा कार्यक्रम गांभिर्याने पाळण्याबाबत विचार विनीयम करण्यात येईल.
सदर बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ता. म. ए. समितीचे अध्यक्ष म्हात्रू झंगरुचे, उपाध्यक्ष सुरेश डुकरे, यल्लाप्पा बेळगावकर, अशोक पाटील, पिराजी मुचंडीकर आणि सरचिटणीस मनोज पावशे यांनी केले आहे.









