सांगली / प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार आता जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक व उपचारात्मक काम सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णांवर उपचार करण्यासाठी पुर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी एक कोविड केअर सेंटर (CCC) त्वरीत सुरू करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.