प्रतिनिधी/ बेळगाव
तालुका पंचायतीची सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 12 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तालुका पंचायतच्या महात्मा गांधी भवनात ही सर्वसाधारण सभा होणार असून अध्यक्षस्थानी तालुका पंचायतचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील उपस्थित राहणार आहेत. तालुक्मयातील वेगवेगळय़ा समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बुडाच्या कारभाराबद्दल यावेळी पुन्हा एकदा विषय सभागृहात मांडण्याची शक्मयता आहे.
कोणालाही विश्वासात न घेता बुडा जमिनी ताब्यात घेत आहे. यापुढे तालुक्मयातील कोणत्याही गावातील जमिनी घ्यायच्या असतील तर तालुका पंचायत, ग्राम पंचायतमधील ना हरकतपत्र बंधनकारक असल्याची ठरावाची प्रत बुडाला पाठविण्यात आली होती. मात्र बुडाने या सर्व सदस्यांच्या ठरावाकडे दुर्लक्ष केले असून मागील महिन्यांभरापासून कोणतेच उत्तर पाठविण्यात न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हा विषय आता मोठय़ा प्रमाणात गाजण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.
तालुका पंचायतीचा कार्यकाळही संपत आला असून आणखी पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या बैठकीकडे साऱयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ही बैठक शेवटची होण्याची शक्मयताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीतील चर्चा महत्त्वाची होण्याची शक्मयता आहे.









