प्रतिनिधी/ बेळगाव
तालुक्मयातील 2018-19 सालची ताळेबंद बैठक शनिवारी पार पडली. केवळ 15 मिनिटात ही बैठक आटोपती घेण्यात आली. अधिकाऱयांनी जमा-खर्च वाचून दाखविताच या बैठकीची सांगता करण्यात आली. या बैठकीकडे तालुका पंचायत सदस्यांनीही पाठ फिरविली होती.
तालुका पंचायतमध्ये ताळेबंद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला केवळ मोजकेच सदस्य आणि अधिकारी उपस्थित असल्याने ही बैठक केवळ 15 मिनिटात आटोपण्यात आली. अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मारुती सनदी, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी उपस्थित होते.
शनिवार दि. 18 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी सभागृहात ही बैठक झाली. तालुका पंचायतीच्या संबंधित अधिकाऱयांनी मागील वेळी झालेल्या जमा-खर्चाचा तपशील मांडला. सर्वसाधारण फंडातून 1 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याची बिलेही झाल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर स्टॅम्प डय़ुटी फंडातून 84 लाख रुपये आले होते. यामधील काही कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही फंडाचा निधी जमा झाला नसल्याने अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे 2018-19 सालातील जमा आणि खर्च यावर चर्चा होणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायतचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी यावेळी ताळेबंद बैठकीचे महत्त्व सांगितले. यावेळी तालुका पंचायत सदस्य आप्पासाहेब किर्तने, लक्ष्मी मेत्री, मनीषा पालेकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.









