ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देशातील युद्ध संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर सोमवारी विमानतळावर असणाऱ्या गोंधळात पाश्चिमात्य राष्ट्रे आपले कर्मचारी परत नेण्याच्या प्रयत्नात दिवसभर होते. त्यामुळे काबूल शहरात सोमवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे तालिबानी एम्यूजमेंट पार्कमध्ये मजा करताना दिसून आले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये तालिबानी एका हातात बंदूक घेत इलेक्ट्रिक कार चालवताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तालिबानी घोड्यावर बसलेले दिसत आहेत.