ऑनलाईन टीम /तरुण भारत
अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यांनंतर काही दिवसात तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. तसेच तालिबान्यांना अफगाणिस्तानावर ताबा मिळवता आला. पण पंजशीर प्रांतावर त्यांना ताबा मिळवता आला नव्हता. पण आता तालिबानने पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानने तालिबान्यांनी पाकिस्तानच्या मदतीने पंजशीर प्रांत ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. पण पाकिस्तानने तालिबानला मदत केल्याचा आरोप फेटाळला आहे. हा खोडसाळपणाचा प्रचार असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.
तालिबानने म्हटले आहे की, सोमवारी त्यांनी पंजशीर प्रांत ताब्यात घेतला. तो अफगाणिस्तानात तालिबानच्या ताब्यात आलेला शेवटचा प्रांत होता. काही बातम्यांनुसार पाकिस्तानी लष्कराने तालिबानला पंजशीरचा ताबा मिळवण्यात मदत केली आहे. पाकिस्तानचे २७ हेलिकॉप्टर्स व ड्रोन विमाने या हल्ल्यात सामील होती. पण पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते असीम इफ्तिकार यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने तालिबानला मदत केल्याचा आरोप खोटा व खोडसाळपणाचा आहे. पाकिस्तानची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करण्यासाठी असे आरोप करण्यात येत आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानात शांतता व संपन्नता नांदावी यासाठी प्रयत्न केले आहेत.
तालिबानच्या बंडखोरांनी ऑगस्टच्या मध्यावधीत अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली होती. वीस वर्षानंतर अमेरिकी सैन्य दलांनी माघार घेतली असून त्यावेळी तालिबानचा अमेरिकेने पराभव केला होता. पंजशीर हा अफगाणिस्तानातील डोंगराळ खोऱ्याचा प्रदेश असून दीड ते २ लाख लोक तेथे वास्तव्यास आहेत. अफगाणिस्तानवर रशियाने आक्रमण केले होते त्यावेळीही पंजशीरने असाच प्रतिकार केला होता. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या ताब्यात होती.