काबुल
डुरंड लाइन सीमेवरून तालिबान व पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या तणावाने जागा केल्याची माहिती आहे. डुरंड लाइन सीमेवर कुंपण वा भिंत घालण्यावरून पाकिस्तानच्या कृतीवर तालिबानने नाराजी व्यक्त करत त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केली आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यावेळी पाकिस्तानने मदत केली होती. त्यावेळी दोन्ही देशात संबंध कसे होते, हे उभ्या जगाला माहिती आहे. पण आता देशात पाकिस्तान-तालिबान सीमेवरील डुरंड सीमेवरील कुंपण घालण्यावरून तणाव वाढला आहे. इतरही मुद्दय़ांवरून उभय देशातील मधुर संबंधात आता कटुता येते आहे. तालिबानचे कमांडर मावल्लवी सनोल्लह सानगिन यांनी तर पाकिस्तानला सीमेवर कोणत्याही प्रकारचे कुंपण घालण्यासाठी परवानगी देणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. पाकिस्तानने आधी जे केले ते केले. पण आता आम्ही त्यांना तसे करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. पाकचे विदेशमंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी दोन्ही देशातील सीमेवरचा वाद शांतीपूर्ण मार्गाने सोडवला जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते.









