ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबान्यांनी अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यालयातही घुसखोरी केली आहे. त्यामुळे अल्पावधीत जागतिक क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केलेल्या अफगाणिस्तानमधील क्रिकेटचे भविष्यही अंधकारमय झाले आहे.
तालिबानचे दहशतवादी एके 47 घेऊन अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या ऑफीसमध्ये घुसलेला फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्यासोबत माजी फिरकीपटू अब्दुल्लाह मजारी हासुद्धा दिसत आहे. मात्र, अफगाण क्रिकेट बोर्डाचे सीईओ हामिद शेनवारी यांनी तालिबानपासून अफगाणी क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांना धोका नसल्याचे म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तानचा संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होईल. एवढेच नाही तर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड 10 ते 25 सप्टेंबरदरम्यान, शपागिजा क्रिकेट लीगचे आयोजन करणार असल्याचाही दावा शेनवारी यांनी केला.









