काबुल: अफगाणिस्तानमधील सत्ता हस्तगत करुन दोन आठवडे झाल्यानंतर तालिबानकडून आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर सरकार स्थापन करणार आहे. फगाणिस्तानात तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर त्यांच्या भूमिकांकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. आता तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला बारादर हा अफगाणिस्तानमधील सरकारचं नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे. तालिबानशीसंबंधित असणाऱ्या सुत्रांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली.
दरम्यान मुल्ला बारादर हा तालिबानच्या राजकीय कार्यालयाचं नेतृत्व करतो. बारादरबरोबरच मुल्ला मोहम्मद याकूबकडेही मुख्य जबाबदारी दिली जाणार आहे. मुल्ला मोहम्मद याकूब हा तालिबानचा सह-संस्थापक असणारा पण काही वर्षापूर्वीच मरण पावलेल्या मुल्ला ओमरचा मुलगा आहे. मोहम्मद अब्बास स्टानिकजईलाही सरकारमध्ये वरिष्ठ पद दिलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय. “तालिबानचे सर्व वरिष्ठ नेते काबूलमध्ये दाखल झाले आहेत. नवीन सरकारची घोषणा करण्याच्या अंतिम टप्पातील चर्चा सुरु आहेत,” असं तालिबानच्या सुत्रांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









