नऊ महिने ओस पडलेल्या तालमी मल्लांनी गजबल्या, कुस्ती अधिवेशनाकडे लक्ष
नऊ महिन्यांनी शाहू विजयी गंगावेश तालमीत दाखल झालेले मल्ल
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे गेली 9 महिने बंद ठेवलेल्या मोतीबाग तालीम, न्यू मोतीबाग तालीम, शाहू विजयी गंगावेश तालीम, शाहूपुरी तालीम, शाहूमिलजवळील हनुमान तालीम, मार्केट यार्डातील शाहू आखाडा यासह शहराच्या आजूबाजूंच्या गावांमधील तालमी शासनाच्य नियम व अटींचे पालन करत कुस्तीगिरांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार परगावाचे मल्ल बोजाबिस्तारा घेऊन तालमींमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी तालमीतील आपल्या लाकडी पेटÎांची साफसफाई करून कुलपे उघडली आहेत. तसेच या पेटÎांमध्ये खुराकापासून कपडÎांपर्यंत आणि जेवणाच्या साहित्यपासून ते अंघोळीच्या साहित्यापर्यंतचे सर्व साहित्य भरले आहे.
दरम्यान, तालीम संघाने केलेल्या आवाहनानुसार शहर व परिसरातील सर्व तालमींनी कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल पाहूनच मल्लांना तालमीत प्रवेश दिला आहे. तसेच सोशल डिस्टन्स पाळूनच मेहनत करणे, झोपताना पाच ते सहा फुटांपर्यंतचे आंतर ठेवणे यासह अन्य सुचना दिल्या आहेत. मल्लही दिवसाची पाहट उजाडल्यानंतर तालमींमधील वस्तादांचे चरणस्पर्श करून आखाडÎातील लालमातीला कपाळी लावत वंदन करत आहेत. तसेच तालमीतील हनुमानाच्या मूर्तीजवळ भारतासह जगातून कोरोना नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करत आहेत. मोठंमोठÎाने हुंकार देत मेहनतीतही स्वतःला झोकून देताहेत. जोर-बैठकांबरोबरच सपाटÎा, दोरीच्या उडÎा, डंबेल्स, सिटप्स, पायऱया चढणे-उतरणे असा वर्कआऊट करत घाम गाळू लागले आहेत.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनाखालील मोतीबाग तालीम मल्लांनी शनिवारी मेहनतीला प्रारंभ केला. तत्पुर्वी तालमीतील हनुमानाच्या मूर्तीसह लालमातीच्या आखाडÎाचे पूजन केले. यानंतर सरावाचाच एक भाग म्हणून गेली 9 महिने आखाडÎात दबून राहिलेल्या लालमातीचे खोऱयाच्या सहाय्याने खोदकाम केले. यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम-अटींची माहिती मल्लांना देण्यात आली. सोशल डिस्टन्स पाळत मल्लांनी सकाळी व सायंकाळी मेहनत करावी, असे आवाहन हिंदकेसरी व वस्ताद दादू चौगुले उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने यांनी केले. यावेळी अशोक पोवार, निलेश देसाई, वस्ताद उत्तम चव्हाण, रामा कोवाड, विजय पाटील, बाबुराव चव्हाण, ज्युनियर कुस्ती कोच सुहेल उपस्थित होते.
वजन नियंत्रणावर जोर
वजन वाढू नये, यासाठी मल्लांना गेली काही महिने घरीच वर्कआऊट करावा लागला. त्यामुळे मल्लांचे वजन काहीसे नियंत्रणात राहिले आहे. आता तालमी खुल्या झाल्याने मल्ल अधिक चांगल्या प्रकारे वर्कआऊट करून वजन आणखी नियंत्रणात आणतीलच. शिवाय भविष्यात होणाऱया स्पर्धांसाठीही ते सर्व बाजूंनी फीट राहतील.
रवींद्र पाटील-(वस्ताद : शाहूपुरी तालीम)









