सातारा / प्रतिनिधी :
जुलै महिन्यामध्ये पाटणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी, दुर्गम भागातील गावांना जोडणारे रस्ते व साकव पूलांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले. त्यामुळे येथील गावांचा दळण-वळणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. नुकसानग्रस्त रस्ते व साकव पूलांच्या पुनर्बांधणीकरीता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी 50 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे सादर केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामीण मार्ग व साकव पूल यांच्या दुरुस्तीसाठी या आर्थिक वर्षासाठी 3054 रस्ते व पूल परिक्षण कार्यक्रम अंतर्गत गट ब व गट क या योजनेअंतर्गत 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने शासन निर्णयही पारित केला आहे.
जंगलवाडी तारळे 15 लाख, तारळे फडतरवाडी घाट रस्ता 20 लाख, दुसाळे ते चव्हाणवाडी रस्ता 15 लाख, मालोशी पोहच रस्ता 15 लाख, महाडिकवाडी 15 लाख, वाघळवाडी रस्ता सुधारणा 15 लाख, जमिणवाडी जळकेवस्ती पैहच रस्ता 20 लाख, गर्जेवाडी गावपोहच रस्ता 20 लाख, भुडकेवाडी, आवर्डे फाटा रस्ता 15 लाख, लोरेवाडी नुने 15 लाख, मालोशी ते पाडेकरवाडी रस्ता सुधारणा 40 लाख, जळव बामणेवाडी रस्ता सुधारण 40 लाख, जन्नेवाडी घाट रस्ता सुधारणा 15 लाख रुपये, पाबळवाडी रस्ता संरक्षण भिंत 15 लाख रुपये, गोरेवाडी माळवस्ती पुल 20 लाख रुपये, वजरोशी मुख्य रस्त्यावर साकव 35 लाख, मुरुड मालोशी रस्त्यावर साकव पुल 35 लाख, आवर्डे रस्ता सुधारणा करणे 20 लाख रुपये, बंबवडे कळंबे रस्ता 40 लाख अशी जवळपास 4.5 कोटींची विकास कामे तारळेविभागात मंजूर झाली आहेत.