मुंबई
तामिळनाडूतील सर्वात जुनी बँक म्हणून गणली जाणारी तामिळनाडू मर्कंटाईल बँक आपला आयपीओ बाजारात दाखल करण्याचा विचार करते आहे. यासाठी बँकेने बाजारातील नियामक सेबीकडे आपला अर्ज रितसर सादर केला आहे. सदरची बँक ही गेल्या शंभर वर्षापासून तामिळनाडूमध्ये ग्राहकांना आपली सेवा देत आहे. सदरच्या आयपीओअंतर्गत 1 कोटी 58 लाख 27 हजार 495 नवे इक्विटी समभाग सादर केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे समभागधारकांद्वारे 12 हजार 505 इक्विटी समभागांच्या विक्रीचा प्रस्तावही असल्याचे समजते.









