ऑनलाईन टीम / चेन्नई :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच तामिळनाडूमध्ये गेल्या चोवीस तासात 4496 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1लाख 51 हजार 820 वर पोहोचली आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आज 5000 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत 1 लाख 2 हजार 310 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

तर कालच्या दिवसात 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 2 हजार 167 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्यस्थितीत राज्यात 47 हजार 340 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बुधवारी 41,382 रुग्णांचे नमुने घेण्यात आले त्यातील 39,715 जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण 17 लाख 36 हजार 747 जणांचे नमुने घेण्यात आले असून त्यातील 16 लाख 65 हजार 273 जणांची तपासणी केली आहे.









