वृत्तसंस्था/ चेन्नई
उष्णतेच्या तडाख्यानंतर तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीमुळे चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, वेल्लोर, रानीपेट आणि तिरवल्लूर या जिल्ह्यांमधील शाळांना सुटी घोषित करण्या आली आहे. अतिवृष्टीमुळे चेन्नईच्या दिशेने यणाऱ्या 6 हून अधिक आंतरराष्ट्रीय विमानो•ाणांना बेंगळूरच्या दिशेने वळविण्यात आले आहे. तर अनेक आंतरराष्ट्रीय उ•ाणांना विलंब झाला आहे.

चेन्नईच्या मीनांबक्कम येथे सोमवारी पहाटेपर्यंत 13.7 सेंटीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाने पाऊस अजून काही काळ सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या अनुमानुसार तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलच्या अनेक भागांमध्ये किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर काहंचीपुरम, चेंगलपट्टू, तिरुवन्नामलाई, कल्लाकुरिची, विल्लुपुरम, कु•ालोर, माइलादुथुराई, नागापट्टणम, तिरुवरून, तंजावर, त्रिची, अरियालुर, पेरम्बलुर समवेत 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.









