अभिनेत्री तापसी पन्नू हिने तेलगू चित्रपट ‘झुम्मंडी नादम’द्वारे स्वतःच्या कारकीर्दीस प्रारंभ केला होता. आता पुन्हा एकदा तापसीने तेलगू चित्रपट स्वीकारला आहे. तापसीने अलिकडेच ‘मिशान इम्पॉसिबल’ असे नाव असलेल्या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

निर्मात्यांनी चित्रपटाचे एक पोस्टर शेअर कर याच्या शीर्षकाची घोषणा केली होती. पोस्टरमध्ये तापसीला डी-ग्लॅमरस अवतारात दाखविण्यात आले होते. या तेलगू चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरुप आरएसजे करणार आहेत. तापसी ‘मिशान इम्पॉसिबल’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. निरंजन रेड्डी आणि अन्वेश रेड्डी हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. दीर्घ काळानंतर तापसी पुन्हा एकदा एखाद्या तेलगू चित्रपटात दिसून येणार आहे. ‘नीवेरो’ हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलगू चित्रपटात तिने यापूर्वी काम केले होते.तापसी आता बॉलिवूडमधील सर्वात गुणवान अभिनेत्री मानली जाते. तिचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.









