वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापूरमधील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील, मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या “सिल्याबस सेटिंग” वरील कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यापीठ व संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न झाली.
शिवाजी विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम सर्वोत्कृष्टच असला पाहिजे, विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा प्रवास हा अभियांत्रिकी ते तंत्रज्ञान, व तंत्रज्ञान ते उद्योगाकरिताचे कौश्यलय असा सुरु झाला असल्याचे मत शिवाजी विद्यापीठ असोसिएट डीन ( सायन्स अँड टेकनॉलॉजि ) डॉ. एस. एच. सावंत यांनी व्यक्त केले. पूर्वीच्या काळी औद्योगिक संस्था अडचणी सोडविण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्याकडे सल्ला घेण्यासाठी येत असत पण आता शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना नवीन टेकनॉलॉजी आत्मसात करण्यासाठी औद्योगिक संस्थाकडे जावे लागते. सध्याचा अभ्यासक्रम ठरवताना सामाजिक अडचणींचा विचार करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
“महाविद्यालयात घेतलेल्या ज्ञानाचा वापर इंडस्ट्री मध्ये करण्यासाठीचा अभियंता बनविणे, उद्योगधंद्यासाठी लागणारे नवीन तंत्रज्ञान व कौश्यल्य याचा विचार करून अभ्यासक्रम आमलात आणणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट असायला हवे”, असे मत तात्यासाहेब कोरे ऊर्जाकुर चे अभियंता श्री. संदीप खोत यांनी व्यक्त केले.
संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी नवीन अभ्यासक्रम हा विध्यार्थ्याना नोकरी आणि उद्योगधंद्यांच्या संधी उपलब्ध करून देणारा, औद्यगिकरणासाठी लागणारा अभियंता घडवणारा असावा हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट असून सध्याच्या स्पर्धेच्या युगात पन्नास टक्के हुन अधिक नोकऱ्या सर्व्हिस सेक्टर मध्ये उपलब्ध असून याचा हि विचार अभ्यासक्रम ठरवताना करावा असा सल्ला दिला.
शिवाजी विद्यापीठ बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर आणि मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. ए. एस. तोडकर यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांची चाचपणी करून अभ्यासक्रम ठरवावा, शिवाजी विद्यापीठचा अभ्यासक्रम इतरांच्या तुलनेत खूपच चांगला असून तो सर्वोत्कृष्ट करण्याची संधी आमच्या महाविद्यालयाला दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले.
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. आर. जी. जोशी, इन्चार्ज ट्रेनिंग सेंटर, ऍडव्हान्स मेजरींग सिस्टिम यांनी मार्गदर्शन करताना उद्योग क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञानाचा विचार करावा, विद्यार्थी व इंडस्ट्रीज यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाला उद्योजकीय वातावरणाची जोड द्यावी, तसेच विध्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
विद्यापीठ संलग्न सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ञ प्रतिनिधींनी तसेच माजी विध्यार्थी श्री कुलभूषण पाटील (एकसाईस ऑफिसर ) यांनी या कार्यशाळेत उत्साहाने सहभाग नोंदविला व विध्यार्थ्याना येणाऱ्या स्पर्धेसाठी सक्षम बनविणारा अभ्यासक्रम तयार केला. या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एम. एस. धुत्तरगाव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. हि परिषद यशस्वी करण्यासाठी विभागातील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मच्यार्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. डी. जोशी यांनी केले.
या कार्यशाळेसाठी वारणा विभाग शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष् डॉ. विनयरावजी कोरे यांनी हि कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी.. शुभेच्छा दिल्या.