वकिलांचा जिल्हा प्रशासनाला इशारा23 डीआय 6 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व न्यायालय आवारासमोर सुरू असलेले संथगतीचे काम.
प्रतिनिधी /बेळगाव
कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ कार्यालयापर्यंतच्या संगोळ्ळी रायण्णा रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कार्यालयीन कामकाजावेळीच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. याबाबत वकिलांसह इतर नागरिकांनी तक्रारी केल्या. तरीदेखील कंत्राटदार गांभीर्य घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. तेव्हा तातडीने हे काम पूर्ण करावे, अन्यथा पुन्हा रास्ता रोको करू, असा इशारा वकिलांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार आणि न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर रस्त्याचे काम सुरू आहे. ते रात्रीच्या वेळी तसेच सुटीच्या दिवशी करणे गरजेचे होते. मात्र, सकाळी 10 वाजता कामाला सुरुवात करायची आणि सायंकाळी 6 वाजता काम बंद करायचे, असा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. यातच न्यायालयामध्ये पक्षकार आणि त्यांच्या वाहनांना प्रवेश नसल्यामुळे त्यांना रस्त्यावरच थांबावे लागत आहे. या सर्वाचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
असे असताना कंत्राटदाराने मात्र अत्यंत संथगतीने आपले काम सुरू ठेवले आहे. या रस्त्यावरीलच काम इतक्मया संथगतीने सुरू असेल तर शहराच्या इतर भागांची अवस्था काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तेव्हा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी संबंधित कंत्राटदाराला समज द्यावी. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.









