वृत्तसंस्था/ दुशनेबी
कोरोना व्हायरस महामारीमुळे ताजिकस्तानमधील फुटबॉल हंगाम 10 मेपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय रविवार जाहीर करण्यात आला. ताजिकस्तानमध्ये कोरोना प्रसार अधिक होण्याची शक्यता असल्याने शासनातर्फे खबरदारीचे उपाय म्हणून फुटबॉल स्पर्धा तसेच शालेय संस्था काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारपासून ताजिकस्तानमध्ये या नियमाच्या अंमलबजावणीला प्रारंभ होणार असून रविवारी मात्र प्रेक्षकविना शेवटचा फुटबॉल सामना खेळविला जाणार आहे, अशी माहिती ताजिकस्तान फुटबॉल फेडरेशनतफें देण्यात आली आहे. चीनपासून जवळच असलेल्या ताजिकस्तानमध्ये सध्या कोरोनाचे नवे रूग्ण आढळलेले असून त्यांची संख्या सुमारे 100 आहेत. दोन आठवडय़ासाठी शालेय संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार असून विदेशातील आयात केलेल्या धान्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.









