प्रतिनिधी / बांदा:
कोकणात प्रचंड जैवविविधता आहे. परंतु वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबधच येत नाही. सद्याच्या दगादगीच्या जीवनात माणसांला फारसा वेळ नसल्याने वनजीवांची माहीतीपासून दुर ओढवत चालला आहे. ही परस्थिती बदलण्यासाठीचे व वन्य जीवाचे रक्षण होण्यासाठी, तसेच नवीन युवा पीढीला आनंद घेण्यासाठी या ‘वन्यजीव सप्ताह’ १ ते ७ आक्टोंबर निमित्ताने साजरा करण्यात येत असल्याचे बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी सांगितले. बांदा वनपरिमंडळा अंतर्गत तांबुळी ग्रामपंचायत येथे शनिवारी ‘वन्य जीव सप्ताह’ साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच तांबुळी अभिलाष देसाई,बांदा वनपाल अनिल मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ, सर्व वन कर्मचारी उपस्थित होते.
Previous Articleमाडखोल धरण परिसराची साफसफाई
Next Article दोडामार्ग न्यायालयतर्फे आज पॅन इंडिया जागृती मोहीम









