स्वच्छ सुंदर तांबुळी” या उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग
ओटवणे / प्रतिनिधी:
तांबुळी मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सध्या मोठया प्रमाणात झाडी – झुडपे वाढल्याने याचा फटका वाहनचालकांसह पादचार्यांना बसत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा मार्ग असुन हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तांबुळी गावातील ग्रामस्थ व युवकांनी एकत्र येत “स्वच्छ सुंदर तांबुळी” या उपक्रमांतर्गत गावातील या मुख्य रस्त्याची श्रमदानातून साफसफाई केली. या उपक्रमाचे तांबुळी परिसरातून कौतुक होत आहे. तांबुळी गावात जाणारा हा रस्ता मूळात अरुंद असून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे अनेक वेळा या रस्त्यावर लहानसहान अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या रस्त्याची श्रमदानातून साफसफाई करण्याचे गावातील युवक ग्रामस्थांनी ठरविले. यावेळी या रस्त्याच्या साईडपट्टी भागाचीही स्वछता करण्यात आली. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची साफसफाई केल्याबद्दल या भागातील वाहन चालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी तांबुळी सरपंच अभिलाष देसाई, माजी सरपंच शिवराम सावंत, माजी उपसरपंच बाबु तांबुळकर, ग्रामपंचायत सदस्य शांताराम सावंत, भास्कर सावंत, विलास नाईक, महेश सावंत, यशवंत सावंत, नाना सावंत, बबलू सावंत, उमेश भोसले, काका सावंत, चेतन दळवी, नारायण सावंत, संजय सावंत, रविंद्र सावंत, कमलाकर सावंत, उत्तम सावंत, सोमदत्त सावंत, रमेश सावंत, सचिन सावंत, मनोहर नाईक, मित्तल देसाई, महादेव पोपकर, विश्राम सावंत, कृष्णा सावंत, कुणाल सावंत, संतोष सावंत, अमोल सावंत, आत्माराम सावंत, विजय सावंत, तेजस सावंत, भाई सावंत, नितेश सावंत, सिताराम सावंत, विश्वास सावंत, लवू कदम, दिलीप कदम आदीनी या श्रमदानात सहभाग घेतला.









