नागपूर \ ऑनलाईन टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रेशनवरील तांदूळ घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले असून याची व्याप्ती पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत गेली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पूर्व विदर्भात पंतप्रधान जनकल्याण योजनेतील रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहेत त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. या तांदूळ घोटाळ्याची अद्याप चौकशी झाली नसल्यानं शंका वाढल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. चौकशी झाल्यास अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यात अन्न पुरवठा अधिकारी आणि राईस मिलच्या मालकांचा समावेश असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ज्यांनी सहकार चळवळीत चुकीचं काम केलं. सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्याबाबत भीती आहे. मात्र, ज्यांनी सहकार श्रेत्रात चांगलं काम केलं, त्यांनी या नव्या खात्याचं स्वागतच केल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री अमित शहा हे खूप आधीपासून सहकार क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनात बैलगाडी कोसळल्यावरुन जोरदार टोलेबाजी केली.काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी कोसळल्याचा व्हिडिओ पाहिला तर राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं ते चित्र आहे. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.
Previous Articleआरआयटीची एआयसीटीई-आयडिया लॅबसाठी निवड
Next Article आशिष शेलार यांच्याकडून जिल्हा भाजपचा आढावा








