मुंबई/प्रतिनिधी
‘म्हाडा’तर्फे आज रविवारी ५६५ पदांसाठी पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यांनी रात्री उशिरा ट्विटरवरून ही माहिती दिली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांची माफी देखील मागितली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली आहे. परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली आहे. मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने तसंच रात्री उशिरा याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला तसंच म्हाडाच्या वेबसाईटवर एका व्हिडीओ पोस्ट केला असून ही परीक्षा आता पुढील वर्षी होणार आहे अशी माहिती दिली.