ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहाव्वूर राणाचा जामीन अर्ज अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळला आहे.
मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली राणाला 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, जूनमध्ये राणाला तुरुंगातून सोडण्यात आले होते. राणाला भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून 10 जून रोजी लॉस एंजेलिसमध्ये पुन्हा अटक करण्यात आली. भारतात राणाला फरार घोषित करण्यात आले आहे.
राणा हा कॅनडातील एक उद्योजक आहे. तो पळून जाण्याची शक्यता असल्याने लॉस एंजेलिसमधील डिस्ट्रीक्ट कोर्टाच्या न्यायाधीश जॅकलीन चूल्जियन यांनी राणाचा जामीनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. तो कॅनडाला पळून गेला तर भारतातील संभाव्य फाशीच्या शिक्षेपासून त्याचा बचाव होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.









