सातारा / प्रतिनिधी :
सातारा तहसील कार्यालयाच्या गेटमधून बाहेर येणाऱ्या युवकावर दोन अज्ञातांनी चाकूने वार केल्याची घटना शनिवारी (दि. 7) रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणाची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, असरार अकबर पालकर (वय 28, रा. गुरुवार परज) याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटच्यासमोर गाडी घेवून निघाला होता. त्याने हॉर्न दिल्याच्या कारणावरुन अनोळखी दोन जणांनी चिडून शिवीगाळ करत खिशातील चाकूने पालकर याच्या खांद्यावर वार करुन जखमी केले. तसेच दगडाने मारहाण केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार जगदाळे हे तपास करत आहेत.