लाख रुपयांचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी नाही
वार्ताहर /तवंदी
तवंदी घाटात मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाल्याची घटना उघडकीस आली. या अपघातात कंटेनरचे सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेले नाही.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, मालवाहू कंटेनर (आर. जे. 14 जीके 9406) हा बेंगळूरहून पुण्याच्या दिशेने जात होता. दरम्यान तवंदी घाटात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा मालवाहू कंटेनर दुभाजकावर जाऊन पलटी झाला. यात सुदैवाने कंटेनर चालक कसेबसे बाहेर पडले. ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर म. गांधी हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जयहिंद कंपनीचे प्रकाश बामणे व त्यांचे साथीदार तसेच शहर सहायक फौजदार मुजावर, पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान अपघातानंतर काहीकाळ वाहतूक संथगतीने सुरू होती. शेवटी जयहिंद कंपनीचे कर्मचारी व पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. जवळपास तासाभराच्या अथक परिश्रमानंतर पेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात आला.
या घटनेची नोंद बराच उशिरा झालेली नव्हती. अधिक तपास सहाय्यक फौजदार मुजावर करीत आहेत. सध्या लॉकडाऊननंतर महामार्गावर वाहतूक जोर धरीत आहे. तवंदी घाट हा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चालकांनी गाडी चालविताना काळजी घेणे गरजेचे आहे..









