प्रतिनिधी / मालवण:
मालवण तालुक्यातील तळाशिल येथील पर्यटन व्यवसायिक मनीष यशवंत तारी (22) या युवकाने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मनीष तारी पर्यटन व्यवसायात कार्यरत होता. यासाठी त्याने गाडय़ांची खरेदी केली होती. मनिषचे शालेय व कॉलेज शिक्षण मालवण शहरात झाले होते. त्याच्या आकस्मित मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.









