प्रतिनिधी/ फोंडा
तळावली येथील पाच दिवसांच्या दसरोत्सवाची आज शुक्रवार 30 रोजी सांगता होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारी मार्गदर्शक तत्त्वानुसार मर्यादित स्वरुपात हा उत्सव साजरा होत आहे.
दसरोत्सवाच्या काळात सर्व पारंपारिक विधी व मूळ स्थानांना तरंगानी भेटी दिल्या. ग्रामस्थ व भाविकांकडून पूजासेवा मात्र स्वीकारली जात नाही. आज शुक्रवार 30 रोजी सकाळी लाडबाय मंदिरात धार्मिक विधी, नंतर श्री रामपुरुष मंदिरास भेट व कामरभाट मार्गे व्याघ्र देवास श्रीफळ वाढवून दोन्ही तरंगांचे रवळनाथ मंदिराकडे कवळास प्रस्थान होणार आहे. श्री रवळनाथ मंदिरात सामुहिक गाऱहाण्याने दसरोत्सवाची सांगता होईल. उत्सवात सहभागी होणाऱया भाविकांनी सामाजिक अंतर, मास्कचा वापर व कोरोनासंबंधी अन्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.









