नवे पारगाव / वार्ताहर
तळसंदे तालुका हातकणंगले येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती, नियंत्रण, गैरसमज याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, अकॅडमिक इन्चार्ज इंजि. पी. डी. उके, फार्म ऑपरेशन हेड इंजि. ए. बी. गाताडे व एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते
यावेळी इंजि. प्रदीप साबळे यांनी एड्सच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी कार्यक्रम घेतले जातात. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. जगभर पसरलेला हा रोग होण्याची मुख्य कारणे, एड्सची लक्षणे व एड्स आजाराविषयी गैरसमज या विषयी माहिती दिली.
डॉ. योगेश शेटे यांनी एड्सबद्दल जगभर जनजागृती किती महत्वाची आहे याबद्दल माहिती दिली. एचआयव्ही/ एड्स बाबत अनेक गैरसमज आहेत. हा संसर्गजन्य रोग नसून अश्या लोकांशी चांगले वागा असा संदेश महाविद्यालयाचे अकॅडमिक इन्चार्ज, इंजि. पी. डी. उके यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. प्रदीप साबळे यांनी केले तर आभार डॉ. रणजित पोवार यानी मानले.