वार्ताहर / नवे पारगाव
तळसंदे ता हातकणंगले येथे जमिनीच्या व घराजवळील असणाऱ्या कुंपणाच्या वादातून युवकाचा खून झाला. अविनाश भगवान कांबळे ( वय 35 वर्ष ) असे मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे.
येथील भगवान सहदेव कांबळे व शिवाजी रामू कांबळे या चुलत भावामध्ये जमिनीच्या व घराशेजारील कुंपणावरून वाद होता. आज सकाळी कुंपणाच्या कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये वाद विकोपाला गेला. यामध्ये झालेल्या मारहाणीमध्ये अविनाशचा मृत्यू झाला. अविनाश कांबळे यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई- वडील असा परिवार आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









