प्रतिनिधी / अक्कलकोट
कोरोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी आदेश असताना बेकायदेशीर जमाव जमवून हातात तलवार घेऊन नाचल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंग येथील रहिवासी यासीन अब्बास कटरे व सोहेल अलाउद्दीन कटरे या दोन युवकांसह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेले सर्व तरुण यासिन कटरेच्या शेतात आया है राजा लोगो रे लोगो या गाण्यावर लोकांना घेऊन नाचल्यामुळे व व्हिडीओ तयार करून जनसामान्यांत दहशत निर्माण केली. याप्रकरणी या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पो.कॉ. लक्ष्मण काळजे यांनी दिली असून पुढील तपास वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय जमादार अधिक तपास करत आहेत.
Previous Articleबेपत्ता मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला
Next Article कोल्हापूर : बिबटयाची तीन नखे, प्राण्याचे मांस जप्त









