ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
गूगल अकाऊंट दोन वर्षांपासून निष्क्रिय असेल तर नवीन धोरणांनुसार ते बंद केले जाणार आहे. त्यावरील सर्व डेटा हटवण्यात येईल. 1 जून 2021 पासून गूगल या धोरणाचा अवलंब करणार आहे.
कंपनीने गूगल अकाऊंट बंद होऊ नये, म्हणून युजर्सना गूगल ड्राईव्ह, जीमेल आणि फोटो फिचर्सचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. जे अकाऊंट 2 वर्षाहून अधिक काळ बंद असेल ते पूर्वसूचना देऊन बंद करण्यात येणार आहे. मात्र, त्याची माहिती मिळण्यासाठी युजर्सला मेलवर सक्रिय असणे गरजेचे आहे.
नवीन धोरणानुसार गूगल युजर्स 15 जीबीपर्यंत आपला डेटा गूगल ड्राईव्ह आणि फोटो फिचर्समध्ये साठवू शकणार आहेत. 15 जीबीपेक्षा अधिक डेटा सेव्ह करण्यासाठी युजर्सना 100 आणि 200 जीबी स्टोरेजचे पॅकेज गूगलकडून विकत घ्यावे लागणार आहे.









