ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचविणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत आणि उपचार मिळावेत, हा योजनेचा उद्देश आहे. ही योजना 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि परिवहन सचिवांना पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, अपघातग्रस्तांना तातडीने मदत आणि उपचार मिळावेत, यासाठी नवी योजना सुरू करण्यात येत आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचविणाऱयास पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल. अपघातग्रस्तांना प्रामाणिकपणे मदत करणाऱ्या 10 जणांना राष्ट्रीय स्तरावर एक-एक लाख रुपयांचे पुरस्कार आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.