प्रतिनिधी/ रत्नािगरी
पेट्रोलची दरवाढ येत्या 4 ते 5 दिवसात शंभरी गाठणार आहे. प्रिमीयम पेट्रोलचे दर आताच 100 पर्यंत पोहोचले आहेत़ प्रिमियम पेट्रोलचे दर 100 पर्यंत पोहोचल्याने रत्नागिरीमधील अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपावर युनिटमध्ये 100 आकडा येऊ शकत नाह़ी ते युनिट पेट्रोल पंपचालकांना बंद ठेवावे लागणार आहे. साध्या पेट्रोलचा दर 100 रूपये झाल्यास जवळपास सर्वच पेट्रोल पंपांना हे युनिट बंद ठेवण्याची पाळी येणार आह़े
पेट्रालचे दर सध्या दररोज बदलत आहेत़ त्यानुसार सकाळी पेट्रोल पंप सुरू करताना तेथील पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणाऱया सर्व युनिटचे पॅलिब्रेशन करून नवीन दर त्यात फिड करावे लागतात़ पेट्रोलचा दर जर 100 ऱू झाला तर तो दर या मशिनवर फिड करता येईल का, याचे प्रात्यक्षिक एका पेट्रोल पंपावर घेण्यात आल़े त्यात जे युनिट डिजिटल आहे, त्या ठिकाणी 100 आकडा फिड करता येत़ो मात्र ज्या पेट्रोल पंपावर टॅट सुनो ही प्रणाली वापरत आहेत़ त्या पेट्रोल पंपावर युनिटमध्ये 100 आकडा टाईपच करता येत नाह़ी त्यामुळे या युनिटवर 100 आकडा येत नसल्याने पेट्रोल वितरण करण्यात येणार नाह़ी
अनेक पेट्रोल पंपांवर समस्या निर्माण होणार
शहर परिसरामध्ये 6 हून अधिक पेट्रोल पंप आहेत़ या ठिकाणी टॅट सुनो ही प्रणाली वापरण्यात येत़े पेट्रोल 97.23 रुपये प्रतीलिटर आह़े तर पॉवर पेट्रोल 100.60 रुपये प्रतीलिटर झाले आह़े पेट्रोलचा दर शंभर झाल्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवर समस्या निर्माण होणार आहे.
उदय लोध फोटो….
कंपनी किंवा सरकार मार्ग काढणारच
पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलच्या किंमती दर्शवणारे डिजिटल डिस्प्ले मागील दोन वर्षीपूर्वी आले आहेत़ हे ग्राहकांच्या सुविधेसाठी देण्यात आले आहेत़ डिस्प्लेवर 3 डिजिटची सोय नाह़ी यासाठी कंपनी अथवा सरकार काही तरी मार्ग काढेल़ मशिनमध्ये दर दिसले नाही तरी दराचा बोर्ड लावता येत़ो पॅल्क्युलेटरवरुन हिशोब करता येत़ो दोन वर्षापूर्वी संपूर्ण भारतात अशीच विक्री सुरु होत़ी
-उदय लोध
अध्यक्ष, फामपेडा









