ऑनलाईन टीम / पिंपरी :
नाईट लाईफ बाबतचा विचार तुर्तास मुंबईसाठी आहे. परंतु, पुण्यातून प्रस्ताव आल्यास त्याबाबत विचार करू, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वाकड येथील ‘सर्जा’ रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुंबईकर दिवसरात्र मेहनत करतात त्यांच्यासाठी रात्री भूक लागली तर जायचे कुठे हा प्रश्न असतो म्हणून मी असा प्रस्ताव तूर्तास मुंबईसाठी ठेवला आहे. जर पुण्यातून अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास त्याबाबत विचार केला जाईल.
आदित्य यांनी उद्घाटन केलेले हॉटेल मंगेशकर कुटुंबियांकडून सुरू करण्यात आले आहे. वाकड रस्त्यावरील कस्पटेवस्तीत नदीपात्रास लागून हे हॉटेल आहे. या हॉटेलमुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. हॉटेलचे वेस्टेज नदीपात्रात जाणार नाही, याची ते काळजी घेतील, असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.









