ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती दररोज वाढ होत आहे. राजधानी दिल्लीत तर डिझेलची किंमत 80 रूपयांपेक्षा अधिक झाली आहे. वाढत्या किंमती वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, बिग ब्रेकिंग, भारत सरकारचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय… आता कच्च तेल इराककडून खरेदी केला जाणार नाही. तर जनतेच तेल काढलं जाईल, असे म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या इंधन वाढीवरून अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी केलेली ट्विट आता भाजप सरकारच्या काळात वाढलेल्या किंमती पाहून पुन्हा एकदा रि ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी टोमणे मारले आहेत.









