नगर / प्रतिनिधी :
राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार किती काळ चालेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास सत्तेतील तिन्ही पक्षांना आहे. हे सरकार पाडण्याची गरज नसून ते आपोआप कोसळेल, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता यावर काँग्रेसचे ज्ये÷ नेते यशवंतराव गडाख यांनी भाष्य केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची मंडळी नीट वागली नाहीत, तर उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील, असे मत गडाख यांनी अहमदनगरमध्ये व्यक्त केले आहे. मंत्रीपद, बंगले, खाते वाटपावरुन नाराज होणाऱया काँग्रेसच्या नेत्यांनादेखील त्यांनी घरचा आहेर दिला आहे.









