ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन विजयी झाले तर अमेरिका चीनच्या ताब्यात जाईल, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
निवडणुकीसंदर्भात एका मुलाखतीवेळी ट्रम्प बोलत होते. ट्रम्प म्हणाले, चीन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू शकतो, असा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. तसेच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना निवडून आणण्यासाठीही चीन प्रयत्नशील आहे. बायडेन निवडून आले तर अमेरिका चीनच्या ताब्यात जाईल.
बायडेन हे चीनच्या प्रभावाखाली वावरणारे नेते आहेत. त्यांनी उमेदवारीच्या पहिल्या भाषणात उल्लेख न केलेल्या मुद्द्यांमध्ये चीनचाही समावेश होता. आजपर्यंत एकाही नेत्याने चीनविरोधी भाष्य केले नाही, अथवा ठोस भूमिका घेतली नाही, असेही ट्रम्प म्हणाले.









