प्रतिनिधी/आजरा
आजरा तालुक्याच्या जीवाभावाचा स्नेही बनलेल्या दैनिक ‘तरूण भारत’ च्या आजरा कार्यालयाचा वर्धापनदिन मोठय़ा उत्साहात पार पडला. वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘ग्रामविकास’ या विशेषांकाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. तरूण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर सभापती उदयराज पवार, उपसभापती वर्षा बागडी, माजी सभापती रचना होलम, मसणू सुतार, निवासी संपादक मनोज साळुंखे, व्यवस्थापक मेघराज सटवाणी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याला प्रारंभ करण्यात आला.
गुरूवारी संध्याकाळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार तसेच विविध सर्व क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, वाचक या सर्वांची पावले आजरा बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोरील ‘तरूण भारत’च्या कार्यालयाकडे वळली. आजरा तालुका शेतकरी संघाच्या भव्य इमारतीमध्ये असलेल्या या कार्यालयासमोरील प्रांगणात स्नेहमेळाव्यासाठी खास मंच उभारण्यात आला होता. सायंकाळी 5 ते रात्री 8.30 वाजेपर्यत अनेकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवून ‘तरूण भारत’च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंतराव शिंपी, जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी, नगरसेवक विलास नाईक, अभिषेक शिंपी, नगरसेविका संजीवनी जाधव, माजी सभापती रचना होलम, मसणू सुतार, अनिता नाईक, साखर कारखान्याचे संचालक दिगंबर देसाई, तालुका संघाचे माजी चेअरमन सुधीर देसाई, संचालक धोंडीराम परीट, आप्पसाहेब देसाई, आजरा अर्बन बँकेचे चेअरमन सुरेश डांग, संचालक विजयकुमार पाटील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संभाजीराव सरदेसाई, जनता गृहतारण संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. निवासी संपादक मनोज साळुंखे, व्यवस्थापक मेघराज सटवाणी, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, विभागीय प्रतिनिधी जगदीश पाटील, आजरा तालुका प्रतिनिधी सुनील पाटील यांनी शुभेच्छा स्विकारल्या.
यावेळी तरूण भारतचे वितरण प्रतिनिधी संदीप सबनीस, जाहीरात वसुली प्रतिनिधी अमृत कातकर, सागर पाटील, अजय हसबे तसेच तालुक्यातील वार्ताहर सुभाष पाटील, महादेव कुडव, शिरिष ठाकुर यांच्यासह वाचक, जाहीरातदार, विक्रेते व मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.