वारणानगर / प्रतिनिधी
सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या वारणा नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकऱ्यांनी पोलिसांच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे शेतात जाण्यासाठी मागितलेल्या परवान्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेश दिल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी परवाना प्राप्त झाला असून परवान्याचे अधिकार स्थानिक पोलिसांकडे दिले आहेत. आज शनिवार पर्यंत ८० शेतकऱ्यांना परवाने देण्यात आले आहेत.
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न, उत्पादन, शेती साधनांचे वितरण व किरकोळ विक्री, विविध कृषी यंत्रसामग्री व उपकरणे यांची विक्री इत्यादी कापणीसारख्या विविध कृषी कार्यात स्पष्टपणे स्पष्ट केले. या अनुषंगाने महसूल व वनविभागाचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी ४ मे रोजी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी यांना काढलेल्या आदेशात शेतीसह शेतीपूरक उद्योग, कृषी यांत्रीक साहित्याची तसेच बी बीयांनाची दुकाने यांना गर्दी टाळण्यासाठी वेळ वाढवावा तसेच शेतकरी व शेतमजूर यांना पूर्णता या कामासाठी मुक्त मोकळीक मिळावी कोठेही अडवणूक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यानी पोलीस यंत्रनेला आदेश द्यावेत, कृषी अधिकारी यानी पास द्यावेत असे आदेश दिले आहेत. तथापी जिल्हा बंदीच्या नांवाखाली चेकपोष्टवर असलेले पोलीस शेतकऱ्यांची अडवणूक करीत होते याचे वास्तव वारणा नदीच्या तिरावरील दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवरील गावात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनुभवायला मिळत होते.
अखेर वारणा परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीसांच्या त्रासाला कंटाळून थेट जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना शेतात जाण्याचा परवाना निवेदनाद्वारे मागितला. यावर जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यानी जिल्हाधिकारी देसाई यांच्याशी बैठक केल्यावर पन्हाळा उपविभागाचे प्रांताधिकारी अमित माळी यांना हा प्रश्न सोडवण्याचा आदेश दिल्यावर प्रांताधिकारी इस्लामपूर, यांच्याशी चर्चा करून कुरळप पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक अरविंद काटे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांना सातबारा व अधार कार्डाची छायाकिंत प्रत घेवून शेतकऱ्यांची स्वतंत्र परवाना यादी तयार करून सिमेवरील चेकपोष्टवर देवून त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सोडण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रातांधिकारी अमित माळी यानी दिेले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी,पन्हाळा, हातकंणगले,शिरोळ सांगली जिल्ह्यातील शिराळा,वाळवा, मिरज या सात तालुक्यातील वारणा नदीच्या दोन्ही तिरावरील गांवातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी कमी अधिक प्रमाणात अलिकडे – पलीकडे करण्याचा प्रश्न भेडसावत होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








