बेळगाव :/ प्रतिनिधी
तरूण भारतने त्यांच्या व्यथा मांडल्या त्यांची कोंडी समाजाच्या लक्षात आली आणि लगेचच त्यांना मदतही मिळाली. ‘बंदीस्त खोलीत घुसमट सुरू… वारांगनांचे अश्रु कोण पुसणार’ हा वारांगनांच्या लॉकडाऊन काळातील स्थितीचा वृतांत शुक्रवार दि. 24 रोजी प्रसिध्द झाला. एका दुर्लक्षित, वंचित घटकांची व्यथा तरूण भारतने मांडली, या घटकाला पुढे येऊन मदत मागणेही अशक्मय आहे. परंतू मदतीची त्यांना नितांत गरज आहे. हे समाजाच्या लक्षात आले.
या वृतांत वाचल्यानंतर समाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून काही वारांगनाना मदत केली. वारांगनांच्या वृताबद्दल तरूण भारतला धन्यवाद देतानाच त्यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या उपस्थितीत पोलीसांना भोजन दिले त्याचवेळी काही वारांगनाना जीवनावश्यक साहित्याचे वितरण केले. ऍलन मोरे, जावेद मुशापुरी यांच्या हस्ते हे साहित्य देण्यात आले.









