प्रतिनिधी /बेळगाव
अल्पावधीत स्थिरावलेली व नित्य नवीन जनहितकारी गुंतवणूक योजनांद्वारे प्रसिद्धीस आलेली तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित ग्राहकांच्या वाढत्या विश्वासाला पात्र ठरत असून अधिकाधिक ठेवीदारांचे आर्थिक गुंतवणूक केंद्र ठरत आहे.
वर्धिष्णू ही मुदतठेव योजना, आनंदवर्धिनी ही मासिक उत्पन्न योजना, लक्ष्मीवृद्धी पुनर्ठेव योजना, सुखदा रिकरिंग योजना तसेच 81 महिन्यात शतप्रतिशत ही दामदुप्पट योजना अशा विविध उपयुक्त योजनांतून ठेवीदार सुरक्षित व आकर्षक व्याजद्वारे आपली नियोजित उद्दिष्टे गाठू शकणार आहेत. वर्धिष्णू या योजनेंतर्गत तीन वर्षांच्या ठेवींवर आकर्षक 10 टक्के व्याजदर व ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्का अधिक व्याजदराचाही लाभ उठविता येतो.
सातत्याने ग्राहकोपयोगी योजनांचा विचार करणाऱया तरुण भारत सौहार्द सहकारीला मिळणारा भरघोस प्रतिसाद तिच्या प्रगतीचे निर्देशक ठरत आहे. अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, नार्वेकर गल्ली, बेळगाव फोन नं. 0831-2424777 किंवा मोबाईल क्रमांक 9108540877 या क्रमांकावर संपर्क साधा.









