प्रतिनिधी /बेळगाव
तरुण भारत सौहार्द सहकारी नियमिततर्पे नवरात्रीचे औचित्य साधून घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘अमृतधन’ मुदत ठेव योजना व ‘धनसागर’ रिकरींग ठेव योजना सुरू करण्यात येत आहेत. 7 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये या योजनेत गुंतवणूक करता येईल. ‘अमृतधन’ या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना एका लाखाच्या गुंतवणुकीवर 27 महिन्यात सव्वा लाख परतावा मिळेल. किमान गुंतवणूक रूपये 10000 व त्या पटीत करता येईल. याचप्रमाणे धनसागर रिकरींग ठेव योजनेअंतर्गत दर महिन्याला किमान 600 रूपये 5 वर्षे 3 महिने भरल्यास 50000 परतावा मिळेल. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर या योजनांचा शुभारंभ होत असून अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, नार्वेकर गल्ली, बेळगाव फोन 0831-2424777 किंवा मोबाईल क्रमांक 9108540877 वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









