मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना : निपाणी तरुण भारत कार्यालयाचा वर्धापनदिन थाटात
प्रतिनिधी /निपाणी
सीमालढय़ाचा केंद्रबिंदू असलेला तरुण भारत हा स्वातंत्र्यलढा, गोवामुक्ती संग्राम यासह अन्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरला आहे. सामान्य जनतेवर होणाऱया जुलूम, अत्याचाराविरोधात लेखणीच्या माध्यमातून प्रहार करण्याचे काम गेली शंभरहून अधिक वर्षे तरुण भारत करत आहे. समाजात घडणाऱया प्रत्येक चांगल्या-वाईट घटनांचे वस्तूनिष्ठपणे अवलोकन करत कोणताही पूर्वग्रहदूषित भाव न ठेवता त्या वाचकांसमोर मांडण्याची परंपरा तरुण भारतने कायमच जोपासली आहे. त्यामुळेच तरुण भारत हा वाचकांच्या प्रेमाचे प्रतिक बनला आहे, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
तरुण भारतच्या निपाणी कार्यालयाचा 28 वा वर्धापनदिन मंगळवार 15 रोजी मोठय़ा थाटात संपन्न झाला. यावेळी निपाणी शहर, तालुका व परिसरातील हजारो वाचकांनी उपस्थित राहून तरुण भारतवर शुभेच्छांचा वर्षाव केला. वर्धापनदिनाची सुरुवात दयानंद स्वामी व आकाश स्वामींच्या पौरोहित्याखाली निपाणी शहर प्रतिनिधी अमर गुरव व भाग्यश्री गुरव दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजेने झाली.
यानंतर तरुण भारतच्या ‘टेंड नवा, ध्यास नवा’ या वर्धापनदिन विशेष पुरवणीचे प्रकाशन समाधीमठाचे प्राणलिंग स्वामीजी, तरुण भारत समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर, संचालिका रोमा ठाकुर, संपादक जयवंत मंत्री, व्यवस्थापक गिरीधर रविशंकर, प्रतिनिधी मनिषा सुभेदार, बेळगाव आवृत्ती इन्चार्ज सुनील शिंदे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, माजी. जि. पं. उपाध्यक्ष राजेंद्र वड्डर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, संघ, संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक व वाचकांनी वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. माजी आमदार सुभाष जोशी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, युवानेते उत्तम पाटील, बसवप्रसाद जोल्ले, रोहन साळवे, राजेश कदम, माजी. जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष पप्पू पाटील, ज्येष्ठ नेते गोपाळ नाईक, गेड टू तहसीलदार प्रविण कारंडे, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरे, संतोष सांगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार, सद्दाम नगारजी, संजय सांगावकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, शेरु बडेगर, दत्तात्रय जोत्रे, दीपक सावंत, दिलीप पठाडे, संजय पावले, दीपक पाटील, सुनील शेलार, विनायक वडे, अभिनंदन मुदकुडे, महेश सूर्यवंशी, रयत संघटनेचे चिकोडी तालुकाध्यक्ष राजू पोवार, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, सुनीता होनकांबळे, राजेंद्र चव्हाण, विजय शेटके, किरण कोकरे, राज पठाण, जुबेर बागवान, रत्नशास्त्राr ए. एच. मोतीवाला, इम्तियाज काझी, गोमटेश स्कूलचे उपाध्यक्ष उदय पाटील, निकू पाटील, आडी ग्रा. पं. अध्यक्ष बबन हवालदार, सचिन खोत, गांधी रुग्णालयाचे डॉ. गणेश चौगुले, डॉ. संतोष गाणगेर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक व वाचकांनी शुभेच्छा दिल्या.









